Ganpati Stotra Lyrics in Marathi with PDF :- आज आम्ही तुमच्यासाठी मराठीतील श्री गणपती स्तोत्र बोल घेऊन आलो आहोत. कृपया गाण्याचे बोल पण शेअर करा.
Ganpati Stotra Lyrics in Marathi – श्री गणपती स्तोत्र
|श्री गणपती स्तोत्र||
साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका ।
भक्तीनें स्मरतो नित्य आयुःकामार्थ साधती ॥ १ ॥
प्रथम नांव वक्रतुंड दुसरें एकदंत ते ।
तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र ते ॥ २ ॥
पांचवे श्रीलंबोदर सहावें विकट नांव ते ।
सातवे विघ्नराजेंद्र आठवे धुम्रवर्ण ते ॥ ३ ॥
नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक ।
अकरावे गणपती बारावे श्री गजानन ॥ ४ ॥
देवनांवे अशी बारा तीन संध्या म्हणे नर ।
विघ्नभीती नसे त्याला प्रभो ! तू सर्व सिद्धिदे ॥ ५ ॥
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन ।
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति ॥ ६ ॥
जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ ।
एक वर्ष पुर्ण होतां मिळे सिद्धी न संशय ॥ ७ ॥
नारदांनी रचिलेले झाले संपू्र्ण स्तोत्र हें ।
श्रीधराने मराठींत पठण्या अनुवादिले ॥ ८ ॥
॥ श्रीगणपती स्तोत्र संपूर्ण ॥
Ganpati Stotra Lyrics in Marathi PDF Download
गीत PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
FAQs
Direct link to download Ganpati Stotra Lyrics PDF in Marathi is given on our website. You may visit the website and download the same from there.
आमच्या वेबसाईटवरश्री गणपती स्तोत्र बोल PDF डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक दिली आहे. तुम्ही वेबसाइटला भेट देऊ शकता आणि तेथून ते डाउनलोड करू शकता. How to download Ganpati Stotra Lyrics PDF in Marathi ?
श्री गणपती स्तोत्र बोल पीडीएफ मराठीत कसे डाउनलोड करायचे?