[Lyrics & PDF] अंजनीच्या सुता | Anjanichya Suta Lyrics in Marathi PDF

Anjanichya Suta Lyrics in Marathi with PDF : आज आम्ही तुमच्यासाठी मराठीतील अंजनीच्या सुता बोल घेऊन आलो आहोत. कृपया गाण्याचे बोल पण शेअर करा.

Anjanichya Suta Lyrics in Marathi

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

दिव्य तुझी राम भक्‍ती भव्य तुझी काया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
हादरली ही धरणी, थरथरले आसमान

लक्ष्मणा आली मुर्च्छा लागुनिया बाण
द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण
तळहातावर आला घेऊनी पंचप्राण

सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका
तिथे रामनामाचा तू वाजविला डंका
दैत्य खवळले सारे, परि हसले बिभिषण

हार तुला नवरत्‍नांचा जानकीने घातला
पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला
उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान

आले किती गेले किती संपले भरारा
तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा
धावत ये लवकरी आम्ही झालो रे हैराण

धन्य तुझे रामराज्य धन्य तुझी सेवा
तुझे भक्‍त आम्ही सारे उपाशी का देवा
घे बोलावून आता कंठाशी आले प्राण

Anjanichya Suta Lyrics in Marathi PDF Download

गीत PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

FAQs

How to download Anjanichya Sutaa Lyrics PDF in Marathi ?

Direct link to download Anjanichya Sutaa Lyrics PDF in Marathi is given on our website. You may visit the website and download the same from there.

अंजनीच्या सुता लिरिक्स बोल पीडीएफ मराठीत कसे डाउनलोड करायचे?

आमच्या वेबसाईटवर अंजनीच्या सुता लिरिक्स गीत PDF डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक दिली आहे. तुम्ही वेबसाइटला भेट देऊ शकता आणि तेथून ते डाउनलोड करू शकता.

Leave a Reply