[Lyrics & PDF] जाहलें भजन | Jahle Bhajan Lyrics in Marathi PDF

Jahle Bhajan Lyrics in Marathi with PDF : आज आम्ही तुमच्यासाठी मराठीतील जाहलें भजन बोल घेऊन आलो आहोत. कृपया गाण्याचे बोल पण शेअर करा.

Jahale Bhajan Lyrics in Marathi

जाहलें भजन आम्ही नामितों तव चरणा, नामितों तव चरणा ||

वारुनिया विघ्नें देवा रक्षावे दीना || धृ ||

दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातो, देवा तुजलाची ध्यातो ||

प्रेमें करूनियां देवा गुण तुझें गातों || १ ||

तरी न्यावी सिद्धी देवा हेची वासना, देवा हेची वासना ||

रक्षूनियां सर्वा धावि आम्हांसी आज्ञा || २ ||

मागणें ते देवा आतां एकची आहे, आतां एकची आहे ||

तारूनियां सकळा आम्हां कृपाद्रष्टी पाहें || ३ ||

जेव्हां सर्व आम्ही मिळू ऐशा या ठाया, ऐशा या ठाया ||

प्रेमानन्दें लागू तुझी किर्ति गावया || ४ ||

सदा ऐशी भक्ति राहो आमुच्या मनी, आमुच्या मनी ||

हेची देवा तुम्हां असे नित्य विनवाणी || ५ ||

वारूनियां संकटे आतां आमुची सारी, आतां आमुची सारी ||

कृपेची साउली देवा दीनावरि करी || ६ ||

निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी, चिंता तुम्हा असावी ||

सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावि || ७ ||

निरोप घेतो आतां आम्हा आज्ञा असावी |

चूकलें आमचें काही त्याची क्षमा असावी || जाहले |

Jahle Bhajan Lyrics in Marathi PDF Download

गीत PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

FAQs

How to download Jahale Bhajan Lyrics PDF in Marathi ?

Direct link to download Jahle Bhajan Lyrics PDF in Marathi is given on our website. You may visit the website and download the same from there.

जाहलें भजन बोल पीडीएफ मराठीत कसे डाउनलोड करायचे?

आमच्या वेबसाईटवर जाहलें भजन गीत PDF डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक दिली आहे. तुम्ही वेबसाइटला भेट देऊ शकता आणि तेथून ते डाउनलोड करू शकता.

Leave a Reply