[Lyrics & PDF] लख्ख पडला प्रकाश | Lakh Padla Prakash Lyrics in Marathi PDF

Lakh Padala Prakash Lyrics in Marathi with PDF : आज आम्ही तुमच्यासाठी मराठीतील लख्ख पडला प्रकाश बोल घेऊन आलो आहोत. कृपया गाण्याचे बोल पण शेअर करा.

Lakh Padala Prakash Lyrics in Marathi

लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा
मी पणाचा दिमाख तुटला
अंतरंगी आवाज उठला
ऐरणीचा सवाल सुटला
या कहाणीचा..

इज तळपली, आग उसळली
ज्योत झळकली, आई गं…
या दिठीची काजळ काळी
रात सरली आई गं…
बंध विणला, भेद शिनला
भाव भिनला आई गं…

भर दुखांची आस जीवाला
रोज छळते आई गं…
माळ कवड्यांची घातली गं..
आग डोळ्यात दाटली गं..
कुंकवाचा भरून मळवट
या कपाळीला…

आई राजा उधं उधं उधं..
उधं..उधं..
उधं..उधं..
तुळजापूर तुळजाभवानी आईचा
उधं..उधं..
माहुरी गडी रेणुका देवीचा
उधं..उधं..
आई अंबाबाईचा
उधं..उधं..
देवी सप्तशृंगीचा
उधं..उधं..

बा सकलकला अधिपती गणपती धाव
गोंधळाला याव
पंढरपूर वासिनी विठाई धाव
गोंधळाला यावं
गाज भजनाची येऊ दे गं
झांज सुजनाची वाजु दे
पत्थरातून फुटलं टाहो
या प्रपाताचा

Lakh Padala Prakash Lyrics in Marathi PDF Download

गीत PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

FAQs

How to download Lakh Padala Prakash Lyrics PDF in Marathi ?

Direct link to download Lakh Padala Prakash Lyrics PDF in Marathi is given on our website. You may visit the website and download the same from there.

लख्ख पडला प्रकाश लिरिक्स बोल पीडीएफ मराठीत कसे डाउनलोड करायचे?

आमच्या वेबसाईटवर लख्ख पडला प्रकाश लिरिक्स गीत PDF डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक दिली आहे. तुम्ही वेबसाइटला भेट देऊ शकता आणि तेथून ते डाउनलोड करू शकता.

Leave a Reply