Shri Mahalaxmi Aarti Lyrics in Marathi with PDF : आज आम्ही तुमच्यासाठी मराठीतील जय महालक्ष्मी वससी व्यापकरुपे बोल घेऊन आलो आहोत. कृपया गाण्याचे बोल पण शेअर करा.
Shri Mahalaxmi Aarti Lyrics in Marathi
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता।
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता।
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥ १ ॥
मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी।
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी।
शशिकरवदना राजस मदनाची जननी॥ २ ॥
तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी।
गायत्री निजबीजा निगमागम सारी।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी॥ ३ ॥
अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं।
मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं।
वारी मायापटल प्रणमत परिवारी।
हें रुप चिद्रूप दावी निर्धारी॥ ४ ॥
चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी।
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी।
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी॥ ५ ॥
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥
Shri Mahalaxmi Aarti Lyrics in Marathi PDF Download
गीत PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
FAQs
Direct link to download Mahalakshmi aarti Lyrics PDF in Marathi is given on our website. You may visit the website and download the same from there.
आमच्या वेबसाईटवर जय महालक्ष्मी वससी व्यापकरुपे गीत PDF डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक दिली आहे. तुम्ही वेबसाइटला भेट देऊ शकता आणि तेथून ते डाउनलोड करू शकता. How to download Mahalakshmi aarti Lyrics PDF in Marathi ?
जय महालक्ष्मी वससी व्यापकरुपे बोल पीडीएफ मराठीत कसे डाउनलोड करायचे?