[Lyrics & PDF] आरती विठ्ठलाची | Vitthal Aarti Lyrics in Marathi PDF

Vitthal Aarti Lyrics in Marathi with PDF : आज आम्ही तुमच्यासाठी मराठीतील आरती विठ्ठलाची बोल घेऊन आलो आहोत. कृपया गाण्याचे बोल पण शेअर करा.

Vitthal Aarti Lyrics in Marathi

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामाङ्गी रखुमाईदिसे दिव्य शोभा ।
पुण्डलिकाचे भेटि परब्रह्म आले गा
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥

जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ०॥

तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी
कासे पीताम्बर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी
गरुड हनुमन्त पुढे उभे राहती ॥२॥

धन्य वेणूनाद अणुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा
ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥३॥

ओवाळू आरत्या कुरवण्ड्या येती
चन्द्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिण्ड्या पताका वैष्णव नाचती
पण्ढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती
चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती ।
दर्शन होळामात्रे तया होय मुक्ति
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥५॥

Vitthal Aarti Lyrics in Marathi PDF Download

गीत PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

FAQs

How to download Veetthal Aarti Lyrics PDF in Marathi ?

Direct link to download Veetthal Aarti Lyrics PDF in Marathi is given on our website. You may visit the website and download the same from there.

आरती विठ्ठलाची लिरिक्स बोल पीडीएफ मराठीत कसे डाउनलोड करायचे?

आरती विठ्ठलाची लिरिक्स गीत PDF डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक दिली आहे. तुम्ही वेबसाइटला भेट देऊ शकता आणि तेथून ते डाउनलोड करू शकता.

Leave a Reply