[Lyrics & PDF] हनुमान आरती | Hanuman Aarti Lyrics in Marathi PDF

Hanuman Aarti Lyrics in Marathi with PDF : आज आम्ही तुमच्यासाठी मराठीतील हनुमान आरती बोल घेऊन आलो आहोत. कृपया गाण्याचे बोल पण शेअर करा.

Hanuman Aarti Lyrics in Marathi

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ।
कडाडिलें ब्रह्मांड धाके त्रिभुवनिं ।
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्री हनुमंता ।
तुमचेनी प्रसादें न भियें कृतांता ।
जय देव जय देव ॥ धृ. ॥
दुमदुमलें पाताळ उठिला प्रतिशब्द ।
थरथरल्या धरणीवर मानिला खेद ।
कडकडिले पर्वत उड्डुगण उच्छेद ।
रामीं रामदासा शक्तीचा शोध ॥ २ ॥
जय देव जय देव जय श्री हनुमंता ।
तुमचेनी प्रसादें न भियें कृतांता ।
जय देव जय देव ॥

Hanuman Aarti Lyrics in Marathi PDF Download

गीत PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

FAQs

How to download Hanumaan Aarti Lyrics PDF in Marathi ?

Direct link to download Hanumaan Aarti Lyrics PDF in Marathi is given on our website. You may visit the website and download the same from there.

हनुमान आरती लिरिक्स बोल पीडीएफ मराठीत कसे डाउनलोड करायचे?

आमच्या वेबसाईटवर हनुमान आरती लिरिक्स गीत PDF डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक दिली आहे. तुम्ही वेबसाइटला भेट देऊ शकता आणि तेथून ते डाउनलोड करू शकता.

Leave a Reply