[Lyrics & PDF] सत्यनारायण आरती | Satyanarayan Aarti Lyrics in Marathi PDF

Satyanarayan AartiLyrics in Marathi with PDF : आज आम्ही तुमच्यासाठी मराठीतील सत्यनारायण आरती बोल घेऊन आलो आहोत. कृपया गाण्याचे बोल पण शेअर करा.

Satyanarayan Aarti Lyrics in Marathi

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ॥
पंचारति ओवाळूं श्रीपति तुज भक्तिभावा ॥

विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण ॥
परिमलद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून ॥
घृतयुक्तशर्करामिश्रित गोधूमचूर्ण ॥
प्रसाद भक्षण करितां तूं त्यां प्रसन्न नारायण ॥
जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा

शतानंदे विप्रें पूर्वी व्रत हें आचरिलें ॥
दरिद्र दवडुनि अंतीं त्यातें मोक्षपदा नेलें ॥
त्यापासुनि हें व्रत या कलियुगीं सकळां श्रुत झालें ॥
भावार्थें पूजितां सर्वां इच्छित लाधलें ॥
जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा

साधुवैश्यें संततिसाठीं तुजला प्रार्थियलें ॥
इच्छित पुरतां मदांध होऊनि व्रत न आचरिलें ॥
त्या पापानें संकटिं पडुनी दुःखहि भोगीलें ॥
स्मृति हो‍उनि आचरितां व्रत त्या तुवांचि उद्ध्रिलें ॥
जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा

प्रसाद विसरुनि पतिभेटीला कलावती गेली ॥
क्षोभ तुझा होतांचि तयाची नौका बुडाली ॥
अंगध्वजरायासी यापरि दुःखस्थिति आली ॥
मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णीं परिसीली ॥
जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा

पुनरपि पूजुनि प्रसाद ग्रहण करितां तत्क्षणीं ॥
पतिची नौका तरली देखे कलावती नयनीं ॥
अंगध्वजरायासी पुत्र भेटति येऊनि ॥
ऐसा भक्तां संकटिं पावसी तूं चक्रपाणी ॥
जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा

अनन्यभावें पूजुनि हें व्रत जेजन आचरती ॥
इच्छित पुरविसि त्यांतें देउनि संतति संपत्ति ॥
संहरसी भवदुरितें सर्वहि बंधने तुटती ॥
राजा रंका समान मानुनि पावसि श्रीपती ॥
जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा

ऐसा तव व्रतमहिमा अपार वर्णूं मी कैसा ।
भक्तिपुरःसर आचरती त्यां पावसि जगदीशा ।
भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तूं सर्वेशा ॥
मोरेश्वरसुत वासुदेव तुज विनवी भवनाशा ॥
जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा

Satyanarayan Aarti Lyrics in Marathi PDF Download

गीत PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

FAQs

How to download Satyanarayan Aarti Lyrics PDF in Marathi ?

Direct link to download Satyanarayan Aarti Lyrics PDF in Marathi is given on our website. You may visit the website and download the same from there.

सत्यनारायण आरती बोल पीडीएफ मराठीत कसे डाउनलोड करायचे?

आमच्या वेबसाईटवर सत्यनारायण आरती गीत PDF डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक दिली आहे. तुम्ही वेबसाइटला भेट देऊ शकता आणि तेथून ते डाउनलोड करू शकता.

Leave a Reply